Breaking News

‘व्हाईटवॉश’चा बदला घेण्यासाठी स्टार्क सज्ज : वॉर्नर

पर्थ, दि. 02 - दक्षिण आफ्रिकेतील एकदिवसीय मालिकेत यजमानांविरूद्ध ऑस्ट्रेलियाचा 5-0 असा दणदणीत पराभव झाला होता. या ‘व्हाईटवॉश’चा बदला घेण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क सज्ज आहे, असे आव्हान सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याने दिले आहे. उद्यापासून (3 नोव्हें.) यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला सुरूवात होणार आहे. एकदिवसीय मालिकेत दुखापतीमळे स्टार्कला संघाबाहेर राहावे लागले होते.
‘मिचेल स्टार्क हा आमच्या संघातील आघाडीचा गोलंदाज आहे. काही काळ तो संघाबाहेर होता. पण आता तो द. आफ्रिकेच्या फलंदाजांना धूळ चारण्यासाठी सज्ज आहे. सराव सत्रात मी त्याच्या गोलंदाजीवरही सराव केला. त्याला आता सूर गवसला आहे आणि पर्थसारख्या खेळपट्ट्यांवर स्टार्क फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरू शकतो’, असा विश्‍वास वॉर्नरने व्यक्त केला.