Breaking News

विकास कारखान्यावर गळित हंगामाचा शुभारंभ

लातूर, दि. 02 - यंदा चांगला पाऊस झाला, आता शेतक-यांनी ऊस लागवड करावी. पाण्याचा काटकसरीने वापर करावा, एकरी उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन विकास साखर कारखान्याच्या अध्यक्षा वैशाली देशमुख यांनी केले. विकास सहकारी साखर कारखाना युनिट 02 तोंडार येथे गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याच्या अध्यक्षा वैशाली देशमुख व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी लातूर लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख, माजी आमदार चंद्रशेखर भोसले, नगराध्यक्ष राजेश्‍वर निटुरे, उदगीर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कल्याण पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष गोविंद बोराडे, माजी उपाध्यक्ष विजय देशमुख, संचालक रामचंद्र सुडे, अनंत बारबोले, भैरवनाथ सवासे, वलायतखाँ आजमखाँ पठाण, कार्यकारी संचालक अजित देशमुख आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. प्रारंभी संचालक गोवर्धन मोरे यांच्या हस्ते कारखाना मशिनरीची विधीवत पुजा करण्यात आली. यावर्षी ऊसाची उपलब्धता कमी असली तरी जास्तीत जास्त ऊस विकास कारखान्यालाच मिळेल यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत. शेतक-यांनीही आपले हित लक्षात घेऊन विकास कारखान्यालाच ऊस द्यावा, असे आवाहन माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर भोसले यांनी केले.