Breaking News

त्याग आणि बलिदानचे प्रतीक म्हणजे इंदिरा गांधी ः आ.सपकाळ

बुलडाणा, दि. 20 - आपल्या देशाला इंदिराजी सारख्या कणखर नेतृत्वाचे पंतप्रधान लाभले लोकविकासाचे अनेक धाडसी निर्णय घेऊन तळागाळातील गोरगरीब  जनतेला न्याय देन्याची भुमीका त्यांच्या निर्णातून दिसते वर्तमान स्थितीत निर्माण झालेल्या अराजकतेला इंदिराजींचे विचार मुल्याचे आहेत पाकिस्तानी लष्करशाही  राजवटीचे खरेखुरे चित्र जगापुढे ठेऊन पाकिस्तानाला आंतरराष्ट्रीय पातळीवर एकाकी पाडलं. हे त्यांच्या राजकीय मुत्सद्दीपणाचे द्योतक होतं. अशा धाडसी  निर्णयांमुळेच त्यांची जगात पोलादी महिला म्हणून ख्याती होती.
स्वतंत्रभारताला कणखर नेतृत्व देणार्‍या आणि जागतिक स्तरावर भारताचा ठसा उमटविणार्‍या ’आयर्न लेडी’ म्हणजेच पोलादी महीला इंदिराजी असे  प्रतिपादन आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी केले ते बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटी येथे आयोजित स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त अभिवादन  कार्यक्रमात प्रमुख म्हणून बोलत होते यावेळी प्रमुख उपस्थितीत  जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष श्री.विजय अंभोरे, महाराष्ट्र प्रदेश महिला कांग्रेस कमिटीच्या  उपाध्यक्षा सौ.मिनलताई आंबेकर, सरचिटणीस सौ.जयश्रीताई शेळके,बुलडाणा जिल्हा कांग्रेस कमिटीचे सरचिटणीस दिपक रिंढे,सचिव राजीव काटिकर,बुलडाणा  शहर कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष अ‍ॅड. शरद राखोंडे, माजी अध्यक्ष सुनील सपकाळ,  बुलडाणा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुनील तायडे, माजी अध्यक्ष  डॉ.पुरषोत्तम देवकर, दत्ता काकस, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.लक्ष्मीताई काकस, नाजूकराव जाधव,  गोपालसिंह राजपुत,गौतम मोरे,शैलेश खेडकर हे  उपस्थितीत होते.