बॉयफ्रेण्ड राहुलने प्रत्युषाला सेक्स रॅकेटमध्ये ढकलले होते?
मुंबई, दि. 05 - टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात प्रत्युषा आणि प्रियकर राहुल राज यांच्यातील फोनवरील संभाषणातून, प्रत्युषाला तिसरीच व्यक्ती धमकावत असल्याची माहिती समोर आली आहे.
प्रत्युषाच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी 1200 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपपत्रात आत्महत्येच्या काही दिवस आधी राहुल आणि प्रत्युषा यांच्या फोन संभाषणाचा उल्लेख आहे. प्रेग्नंट असल्याने प्रत्युषा रागात आहे आणि तिसर्याच व्यक्तीकडून जीवाला धोका असल्याचा उल्लेख करत असल्याचे या संभाषणावरुन कळते. ‘बालिका वधू’ या मालिकेत आनंदीची भूमिका साकारलेल्या 24 वर्षीय प्रत्युषाने 1 एप्रिल रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.