उबरच्या समर्थनार्थ एक लाख मुंबईकरांच्या प्रशासनाकडे याचिका
मुंबई, दि. 05 - उबर कॅबने खाजगी उबर समर्थनाच्या एक लाख प्रवासी याचिका महाराष्ट्र परिवहन प्रशासनाला दिल्या आहेत. उबर चालू रहावी, यासाठी उबरने मुंबईकरांकडून याचिका मागविल्या. त्याला मुंबईकरांना भरघोस प्रतिसाद दिला आहे.
टॅक्सीवाल्यांची मुजोरी मुंबईकरांना अनेकदा सहन करावी लागते. त्यामुळे उबरची सेवा ही टॅक्सी वाल्यांपेक्षा चांगली असल्याचे उबेरने याचिकेत म्हटले आहे. उबरच्या अधिकृततेचा प्रश्न नेहमीच ऐरणीवर आला. या याचिकेच्या माध्यमातून प्रवाशांचा आवाज शासनापर्यंत पोहोचला आहे. दरम्यान प्रवाशांच्या या याचिका पाहून मुंबईक रिक्षा-टॅक्सीवाल्यांच्या मुजोरीला वैतागल्याचे पाहायला मिळाले आहे.