फोटोग्राफर्स मारहाणप्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल
टाटा समूहाकडून माफीनामा
मुंबई, दि. 05 -मुंबईतील टाटा हाऊस येथे छायाचित्रकारांना सुरक्षा रक्षकांकडून मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी 6 ते 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज दुपारी टाटा हाऊसची पत्रकार परिषद पार पडणार होती. या परिषदेला सायरस मिस्त्रींनी हजेरी लावणार असल्याने तेथे पत्रकारांसह छायाचित्रकार उपस्थित होते.टाटा हाऊस येथे पोहचलेल्या मिस्त्रींचे फोटो घेण्याच्या तयारीत असलेल्या छायाचित्रकारांचा सुरक्षारक्षकांशी वाद झाला. याच रागातून 8 ते 10 सुरक्षारक्षकांनी छायाचित्रकारांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यात मिड डेचे फोटोग्राफर अतुल कांबळे, टाईम्स ऑफ इंडियाचे संतकुमार आणि हिंदुस्थान टाईम्सचे अर्जीत सेन हे जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान या प्रकरणी टाटा समूहाकडून माफी मागण्यात आली आहे.