अकरा हजार स्वयंसेवी संस्थांची मान्यता केंद्र सरकारकडून रद्द
नवी दिल्ली, दि. 05 - केंद्र सरकारकडून सुमारे 11 हजार स्वयंसेवी संस्थांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. या संस्थांनी जून महिन्याच्या अखेरीपर्यंत आपल्या परवान्याचे नूतनीकरण केले नव्हते. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून 11 हजार 319 संस्थांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. यामध्ये अनाथाश्रम, शाळा आणि यांसारख्या अन्य संस्थांचा समावेश आहे. यामुळे विदेशातून मिळणारा निधी आता या संस्थांना मिळू शकणार नाही. गेल्या वर्षीही तीन वर्षाचा आयकर परतावा न भरल्यामुळे सुमारे 10 हजार अशासकीय संस्थांची मान्यता रद्द करण्यात आली होती.