रिलायन्सला केंद्राचा दणका
नवी दिल्ली, दि. 05 - तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाच्या विहिरींमधून काढलेल्या वायू च्या मोबदल्यात केंद्र सरकारने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल) कंपनीकडे आणि त्यांच्या भागीदारांकडे 1.55 अब्ज डॉलर्सची भरपाई मागितली आहे. रिलायन्सतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाच्या कृष्णा गोदावरी खोर्यातून मागील सात वर्षांपासून नैसर्गिक वायू बाहेर काढत आहे. नैसर्गिक वायू काढणे आणि त्याची विक्री करणे अनुचित असून कंपनीने याप्रकरणी सरकारला भरपाई देणे गरजेचे असल्याचे न्यायामुर्ती ए.पी.शहा यांच्या समितीने म्हटले होते.