Breaking News

सहा मुलींवर अत्याचाराचा संशय, वैद्यकीय तपासणी बाकी : सावरा

बुलडाणा, दि. 05 - बुलडाण्यातील आश्रमशाळेत किमान सहा मुलींवर अत्याचार झाल्याचा संशय आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा यांनी व्यक्त केला आहे. मात्र त्या मुलींची वैद्यकीय तपासणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढत असल्याचे विष्णु सावरा म्हणाले. खामगाव तालुक्यातील पाळा इथल्या कोकरे आश्रमशाळेला भेट दिल्यानंतर पत्रकारांना ही माहिती दिली.
दरम्यान, शाळेला भेट देण्याआधी काँग्रेस कार्यकर्त्यांनी विष्णु सावरा यांच्या ताफ्याला घेराव घालून त्यांना काळे झेंडे दाखवले. मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर कार्यकर्ते पांगले. यावेळी एकनाथ खडसे आणि पांडुरंग फुंडकरही त्यांच्यासोबत होते.