औरंगाबादमध्ये बहुजन क्रांती मूकमोर्चा
औरंगाबाद, दि. 05 - औरंगाबादेत आज बहुजन क्रांती मूकमोर्चाचं आयोजन करण्यात आले आहे. औरंगाबादच्या क्रांती चौकातून या मोर्चाला सुरुवात होत आहे. अॅट्रॉसिटी कायदा अधिक कडक करा, ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लावू नका आणि मुस्लिम समाजाला आरक्षण द्या, अशा प्रमुख मागण्या या मोर्चात करण्यात येणार आहेत. जिल्हाधिकार्यांना मागण्यांचे निवेदन देऊन आमखास मैदानावर या मोर्चाची सांगता होणार आहे. यापूर्वी नांदेड, बीडमध्येही बहुजन मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.