Breaking News

बुलडाणा बलात्कार : आणखी 4 जणांना अटक

बुलडाणा, दि. 05 - बुलडाण्याच्या आश्रमशाळेतील मुलीवरील लैंगिंक अत्याचार प्रकरणी रात्रभरातून आणखी 4 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे अटक केलेल्या आरोपींची संख्या 15 वर पोहोचली आहे. तसेच एकूण 17 जणांविरोधात या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
बुलडाण्यातील पाळा इथल्या कोकरे आदिवासी आश्रमशाळेत 6 मुलींवर अत्याचार झाल्याचा संशय आहे, अशी माहिती अदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी दिली होती. तसेच या कोकरे आदिवासी आश्रमशाळेची मान्यताच रद्द केल्याची माहितीही काल सावरा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बुलडाण्यातील आदिवासी आश्रमशाळेत एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आल्यावर काल विष्णू सावरा यांनी संबंधित आश्रमशाळेला भेट दिली. यावेळी एकनाथ खडसे, पांडुरंग फुंडकर यांनीही आश्रमशाळेची पाहणी केली. यावेळी सावरा यांना आदिवासींच्या रोषालाही सामोरे जावे लागले होते.