प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामसेवकांचे राज्यव्यापी कामबंद आंदोलन : ढाकणे
अहमदनगर (प्रतिनिधी) । 05 - कंत्राटी ग्रामसेवकांचा 3 वर्षाचा सेवा काळ तात्काळ नियमित करावा, ग्रामसेवकांना दरमहा वेतनाबरोबर 3 हजार रुपये प्रवासभत्ता मंजूर करावा, नरेगाकरिता स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी, निलंबित ग्रामसेवकांना प्राधान्य क्रमाने कामावर घ्यावे आदी विविध 15 मागण्यांसाठी राज्यातील 22 हजार ग्रामसेवक दि.7 नोव्हेंबर पासून कामबंद आंदोलन करणार आहेत. ग्रामसेवक युनियनच्या माध्यमातून ग्रामसेवकांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी दोन वर्षांपासून पाठपुरावा करण्यात येत आहे. वेळोवेळी चर्चा करून निवेदने देणे तसेच विविध मार्गांनी आंदोलने करण्यात आली. मात्र आश्वासनांपलिकडे काहीच पदरात पडत नसल्याने ग्रामसेवकांनी कामबंद आंदोलन करून सरकारला जाग आणण्याचे ठरवले आहे, अशी माहिती ग्रामसेवक युनियनचे राज्याध्यक्ष एकनाथ ढाकणे व राज्य सरचिटणीस प्रशांत जामोदे यांनी दिली आहे.
याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात ढाकणे यांनी म्हटले आहे की, ग्रामसेवकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी वेळोवेळी राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. सरकारकडून फक्त आश्वासने देण्यात येतात. प्रत्यक्षात कार्यवाही होत नाही, असा अनुभव आहे. प्रशासनाच्या जाचाला कंटाळून राज्यभरात 28 ग्रामसेवकांनी आत्महत्या केल्या. अतिरिक्त कामांमुळे ग्रामसेवक हैराण झाले आहेत. प्रतिकूल परिस्थितीतही ग्रामसेवक संवर्ग अनेक चांगले कामे करीत आहे. अशा कर्मचार्यांचे न्याय प्रश्न सुटणे आवश्यक असून राज्य कार्यकारिणीच्या औरंगाबाद, ठाणे येथील बैठकीत 7 नोव्हेंबरपासून कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 7 रोजी राज्यातील सर्व पंचायत समिती समोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. दि.11 नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदांसमोर धरणे आंदोलन, 15 नोव्हेंबर रोजी आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन, 17 नोव्हेंबर पासून ग्रामपंचायतीच्या चाव्या गटविकास अधिकार्यांकडे देवून प्रत्यक्ष कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील 239 लोकांवर झालेली चुकीची कार्यवाही रद्द करावी, सन 2011 च्या लोकसंख्येवर आधारित ग्रामविकास अधिकारी पदे व सजे निर्मिती करावी, वैद्यकीय कॅशलेस सुविधा मिळावी, शैक्षणिक अर्हता बदल करावी, राज्यभर आदर्श ग्रामसेवक सोहळ्यास मंजुरी द्यावी, सुधारीत जॉब चार्ट, सन 2005 नंतरच्या ग्रामसेवकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, ग्रामसेवकांना सेवा संरक्षण व सरकारी कर्मचारी मारहाण गुन्हा अजामीनपात्र करणे आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार असल्याचे ढाकणे यांनी सांगितले.
संपूर्ण राज्यातील ग्रामसेवक आंदोलन 100 टक्के यशस्वी करतील, असा विश्वास राज्य पदाधिकारी हनुमंत मुरूडकर, नंदकिशोर वानखेडे, एन.डी.कदम, साहेबलाल तांबोळी, उध्दव फडतारे, रश्मी शिंदे, संजय पाटील, शरद भुजबळ, तारकेश्वरी सोनवणे आदींनी व्यक्त केला आहे.