Breaking News

राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेसाठी पाच खेळाडूंची निवड

अहमदनगर (प्रतिनिधी) । 05 - उत्तर प्रदेशमधील अलिगढ येथे नोव्हेंबर महिन्यात होणार्या 21 व्या राष्ट्रीय अजिंक्यपद सायकलिंग स्पर्धेसाठी नगरच्या पाच  खेळाडूंची निवड महाराष्ट्र संघात झाली आहे. महाराष्ट्राच्या संघाची निवड चाचणी नगरमध्ये नुकताच झाली. प्रणिता सोमण, श्रीनिवास लोंढे, सौरभ गुंड, कृष्णा  हराळे, संकल्प थोरात या सायकलपटूंची निवड झाली आहे. 
अहमदनगर जिल्हा सायकलिंग असोसिएशनतर्फे खेळाडूंचा ओम गार्डन मंगल कार्यालय येथे ओम उद्योग समुहाचे संचालक बाळासाहेब पवार यांनी सर्व खेळाडूंचा  सत्कार केला. माजी महापौर भगवान फुलसौंदर, जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप, असोसिएशनचे सचिव प्रा.संजय साठे, संघटनेचे जिल्हाध्यक्ष माणिकराव  झेंडे, छत्रपती पुरस्कार विजेते सतीश झेंडे व निर्मल थोरात, डॉ.प्रफुल्ल सोमण, राजेंद्र गुंड उपस्थित होते.
बाळासाहेब पवार म्हणाले, नगरमध्ये अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय सायकलपटू निर्माण झाले आहेत. सातत्याने मिळत असलेल्या चांगल्या प्रोत्साहानामुळे नगरमध्ये  सायकलिंग स्पर्धेसाठी चांगला वाव आहे. राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड होणो हे सोपे नसते. अतिशय मेहनत व जिद्दीच्या जोरावर खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत पोहचू  शकतो. अलिगढ येथील स्पर्धेसाठी नगरच्या पाच खेळाडूंची निवड होणो ही अत्यंत कौतुकाची व अभिमानास्पद बाब आहे. निवड झालेले सर्व खेळाडू निश्‍चतच  चांगली कामगिरी असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. प्रा. साठे यांनी प्रास्ताविक केले. या चाचणीसाठी राज्यातील सायकलपटू आले होते. महाराष्ट्राचा संघ या निवड  चाचणीत 41 जणांची निवड झाली. नगरच्या पाच खेळाडूंचा समावेश आहे. 14, 16, 18, 25 व खुल्या गटातून ही राष्ट्रीय स्पर्धा होणार आहे.