Breaking News

शालेय राज्यस्तरीय लगोरी स्पर्धेत मलकापुरचा संघ विजेता; संघातील खेळाडुंची महाराष्ट्र संघात निवड

बुलडाणा, दि. 20 - अलिबाग जि.रायगड येथे नुकत्याच 15 व 16 नोव्हेंबर दरम्यान संपन्न झालेल्या शालेय राज्यस्तरीय लगोरी स्पर्धेत अमरावती विभागाचे  प्रतिनीधीत्व करणार्‍या व मलकापुर येथील विद्याविकास विद्यालयाकडुन घेतलेल्या स्पोर्टस झोन ऑफ मलकापुरच्या खेळाडुंनी राज्य अजिंक्यपद स्पर्धेत  मलकापुरच्या खेळाडुंणी सुवर्ण पदक पटकावित राज्यातुन प्रथम क्रमांक पटकाविला व शाळेचे नाव गाजविले. सुवर्णपदक प्राप्त करणार्‍या संघाला लगोरी स्पोटस  असोसीएशनचे सचिव विजय पळसकर यांचे सदैव मार्गदर्शन व प्रशिक्षण लाभत आहे. महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण व क्रिडा विभाग संचालनालय संचालनालय पुणे  जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय रायगड, महाराष्ट्र राज्य लगोरी असोसीएशन यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग जिल्हा रायगड येथे दि. 15 ते 16 नोव्हेंबर  दरम्यान राज्यस्थरीय शालेय लगोरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत एकुन 14 मुले, मुलीच्या संघानी भाग घेतला होता हा संघाने गतवर्षीसुध्दा  राज्य स्पर्धेत अजिंक्यपद प्राप्त केले होते. पहिला सामना लातुर या संघाला हरवुन सेमी फाईनल मध्ये मुंबई या संघाला पराभव करीत अंतीम सामन्यात पुणे संघाचा  धुव्वा उडवित मलकापुर येथील विद्याविकास विद्यालयाच्या मुलांच्या संघाने अमरावती विभागाचे प्रतिनिधीत्व करीत सुवर्णपदकावर जिल्ह्याचे नांव कोरले.
   रोहीत मापारी यांच्या नेतृत्वाखाली मोहीत मराठे, सौरभ आढाव, यश जंगले, निखील नेमाडे, मयुर काकर, विष्णु धोरण, मनिष मोडरु, अनिकेत मानकर, पवन  घाटे, निखील सुरडकर, व्यवस्थापक आढाव सर, प्रशिक्षक विशाल मापारी यांचा समावेश होता. स्पर्धेतील रोहीत मापारी, मोहीत मराठे, सौरभ आढाव व मृदूला  पाटील यांच्या उत्कृष्ट खेळाच्या प्रदर्शनामुळे महाराष्ट्र संघात निवड झाली. सदर शालेय स्पर्धा दि.22 ते 26 भोपाळ येथे होणार आहे.