ईस्टर्न फ्रीवेवर टॅक्सीचा भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू
मुंबई, दि. 05 - मुंबईतील ईस्टर्न फ्री वेवर टॅक्सीचा भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे जखमी आहेत. टॅक्सीमध्ये एकूण 9 जण असल्याने ओव्हरलोड होती. टॅक्सीतील सर्वजण साऊथबॉण्ड मार्गाने मुंबादेवीच्या दर्शनाला निघाले होते. मात्र वाडीबंदर वळणाजवळ टॅक्सीचा दरवाजा उघडला. त्यानंतर चालकाचा ताबा सुटल्याने टॅक्सी थेट डिव्हायडरला धडकली, त्यानंतर दोन वेळा पलटली.
या अपघातात टॅक्सी चालक गंभीर जखमी झाला आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अपघातानंतर ईस्टर्न फ्री वेवर वाहतूक कोंडी झाली आहे.
या अपघातात टॅक्सी चालक गंभीर जखमी झाला आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अपघातानंतर ईस्टर्न फ्री वेवर वाहतूक कोंडी झाली आहे.