Breaking News

शिर्डीत साईभक्ताकडून 30 किलो चांदीचे सिंहासन दान

शिर्डी, दि. 03 - शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी तब्बल 30 किलो वजनाचे चांदीचे सिंहासन दान करण्यात आले आहे. दिवाळीनिमित्त बडोद्याच्या जयस्वाल या साईभक्त परिवाराने हे सिंहासन भेट दिले आहे.
30 किलो वजनाच्या या सिंहासनाची किंमत 18 लाख रुपये असल्याचे सांगितले जाते आहे. हे सिंहासन शिर्डीतील साईबाबांच्या चावडी मंदिरात ठेवण्यात येणार असून त्यावर साईंची प्रतिमा ठेवणार असल्याची माहिती साई मंदिर संस्थानाने दिली आहे. दिवाळीच्या निमित्ताने देशभरातून लाखो भाविकांनी शिर्डीत हजेरी लावली होती. या भाविकांकडून बाबांना वेगवेगळ्या वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या आहेत.