Breaking News

औरंगाबादमध्ये सॅमसंगच्या गोदामाला आग, फ्रीज, वॉशिंग मशीनचा कोळसा

औरंगाबाद, दि. 03 - औरंगाबादमध्ये रात्री इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या गोदामाला भीषण आग लागली. या आगीत 500 फ्रीज आणि 500 वॉशिंग मशीनचा कोळसा झाला आहे.
वाळूंज येथील सॅमसंग कंपनीच्या गोदामाला काल रात्री आग लागली होती.गोडाऊनमधील एलईडी, फ्रीज, ए. सी., मायक्रोओव्हन, वॉशिंग मशीन आदी साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. सुदैवाने, या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही.