Breaking News

समदृष्टी क्षमता विकास अनुसंधान मंडळ (सक्षम) ची बैठक - संपन्न

बुलडाणा, दि. 01 - समदृष्टी क्षमता विकास अनुसंधान मंडळ म्हणजेच सक्षम या दिव्यांगांसाठी राष्ट्रीय स्तरावर काम करणार्‍या संस्थेची चिखली येथील कार्यकारिणीची बैठक नुकतीच संपन्न झाली. 
समदृष्टी क्षमता एवं अनुसंधान मंडळ म्हणजेच सक्षम हे एक सेवाभावी संघटन असुन याची स्थापना नागपुर येथे सन 2008 मध्ये करण्यात आली. समाजातील दिव्यांग व्यंक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य सक्षम करीत असतो. दिव्यांगाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी संस्था त्यांच्या शिक्षण, आरोग्य, स्वावलंबन, सामाजिक विकास या विविध स्तरावर सक्षमचे कार्य चालते.
सक्षम तर्फे विविध सामाजिक कार्यक्रम राबविण्यात येतात यामध्ये प्रामुख्याने सुरदास जयंती, विश्‍व पर्यावरण दिवस, सक्षम स्थापना दिवस, लई ब्रेल जयंती, हेलेनकेलर जयंती व रक्षाबंधन उत्सव, राष्ट्रीय नेत्रदान पंधरवाडा, राष्ट्रीय सेरेब्रेल पाल्सी दिवस, विश्‍व विललांग दिवस आदी कार्यक्रम प्रामुख्याने साजरे केले जातात. चिखली येथे संपन्न झालेल्या बैठकीसाठी विदर्भ प्रांत सचिव नंदुजी नरोटे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी आगामी 2020 पर्यंत कॉर्नियल अंधत्व मुक्त भारत अभियान अर्थात (कांबा) संपुर्ण जोमाणे चिखली येथे राबविण्याचा निर्धार करण्यात आला.
सदर बैठकीला विदर्भ प्रांत कार्यकारीणी सदस्य व सक्षम चिखलीचे अध्यक्ष मकरंद जोशी, सचिव महेश लोणकर, सदस्य निलेश रूद्राक्ष, दिपक गायकवाड, पवन लढ्ढा, प्रविण अधापुरे, संतोष क्यावल, दत्ता जोशी यांची उपस्थिती होती.