भाजयुमो जिल्हा उपाध्यक्षपदी राजेश निकम
बुलडाणा, दि. 01 - राजेश निकम पाटील यांची भाजयुमो जिल्हा उपाध्यक्षपदी पक्षश्रेष्टींकडून नियुक्ती करण्यात आली. शहर व ग्रामीण भागात भाजयुमो चे संघटन मजबुत करुन पक्षाची ध्येय धोरण युवा वर्गामध्ये रुजवित पक्षासाठीचे कार्य पाहुन भाजपा जिल्हाध्यक्ष धृपतराव सावळे आणि भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख यांनी राजेश निकम पाटील यांची भाजयुमो जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
जळगांव जा.येथे भाजयुमोची जिल्हास्तरीय बैठक घेण्यात आली. यावेळी सदर नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी प्रमुख अतिथी व मार्गदर्शक भाजपा चे प्रदेश उपाध्यक्ष आ.चैनसुख संचेती, आ.संजय कुटे, आ.अॅड.आकाश फुंडकर, यांची उपस्थिती होती. या वेळी वि.आ.चे जिल्हाध्यक्ष प्रदीप ईलग, जिल्हा सरचिटणीस चंदन सहनल, मेहकर शहर अध्यक्ष प्रल्हाद उक्मट, जिल्हा संघटक किरण जोशी, शंकर गायकवाड, व शहर भाजयुमोचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.