Breaking News

सांगलीत तिघांना डेंगीची लागण

सांगली, दि. 27 -  जामवाडी परिसरातील एकाच कुटुंबातील तिघांना डेंगीची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. दिवाळी तोंडावर आली असतानाही डेंगीची साथ  आटोक्यात येत नसल्याचे समोर आले आहे. तिघांना डेंगी झाल्याचे स्पष्ट झाल्याने महापालिका खडबडून जागी झाली. दिवसभर परिसरात तपासणी सुरु होती.
शहरात गेले काही दिवस डेंगीची साथ आहे. साथीची तीव्रता एकदम दिसत नसली तरी शहराच्या विविध भागात रुग्ण आढळून येत आहेत. काही दिरसांपूर्वीच  विश्रामबाग, खणभाग, शामरावनगर आदी परिसरात डेंगीचे रुग्ण आढळून आले होते. आता जामवाडी परिसरातील एकाच दर्यावर्दी कुटुंबात तीन रुग्ण आढळून  आले आहेत.
दिवाळी काही दिवसांवर आली असल्याने सणाची लगबग सुरु आहे. त्यातच तिघांना डेंगीची लागण झाल्याचे समजताच महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले.