Breaking News

दहा लाखाचे खत अप्रमाणित

येळावी (ता. तासगांव), दि. 27 -  येथील क्लास वन अ‍ॅग्रो बायोटेक अ‍ॅन्ड फर्टिलायझर कंपनीचे नऊ लाख 90 हजार रुपये किमंतीचे एक हजार 980 पोती  दुय्यम मूलद्रव्य (खत) नमुने अप्रमाणित आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी सर्व खताला विक्री बंदचे आदेश दिले असून,  खत निर्मितीचा परवाना रद्द का करु नये?, अशी नोटीसही बजाविली आहे.
क्लास वन अ‍ॅग्रो बायोटेक अ‍ॅन्ड फर्टिलायझर कंपनीच्या खतांच्या नमुन्यांची पूर्वीही तपासणी केली होती. यामध्ये 105 टन दुय्यम मूलद्रव्य खत अप्रमाणित  आल्यामुळे, त्यांच्यावर कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी विक्री बंदचे आदेश दिले होते. या कारवाईस महिना झाला आहे. तरीही कंपनीकडून पुन्हा ÷पादन चालूच  होते. याबाबत जिल्हा परिषद विभागाची कृषी विकास अधिकारी आर. जे. भोसले, मोहीम अधिकारी आर. जे. भोसले, मोहीम अधिकारी धनाजीराव पाटील  यांच्याकडे तक्रारी आल्या होत्या. कृषी विभागाच्या पथकाने अचानक कंपनीला भेट देऊन तपासणी केली, तसेच खताचे पुन्हा नमुने घेतले. या खताचे नमुने  तपासणीसाठी कृषी विभागाच्या प्रयोगशाळेकडे पाठविले होते. यामध्ये कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि सल्फर हे घटक कमी आढळून आल्याचे दिसून आले. त्यामुळे  कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी या कंपनीने उत्पादित केलेल्या एक हजार 980 पोती खताच्या विक्रीवर बंदी घातली आहे.
खत कंपनीमध्ये त्रुटी आढळल्यामुळे कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी नोटीस बजावून, तुमचा खत निर्मितीचा परवाना रद्द का करु नये, असे म्हंटले आहे. या  नोटिसीला खत कंपनीने सात दिवसात उत्तर दिले नाही, तर तुमचा परवाना निलंबित केला जाईल, असेही नोटिसीत म्हंटले आहे.
या कारवाईबरोबरच अन्य खत निर्मिती कंपन्यांच्या उत्पादनांचीही अचानक तपासणी करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.