Breaking News

कृषी पंपांना अखंड विज पुरवठा करा अन्यथा तिव्र आंदोलन!

बुलडाणा, दि. 27 - शेतकर्‍यांना अखंडपणे विजपुरवठा करा अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन उभारू, असा इशारा स्वाभी मानी शेतकरी संघटना बुलडाणा  येथील अधिक्षक अभियंताना निवेदनाव्दारे दिला आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नमुद केले आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस  यांनी काही दिवसापुर्वी शेतकर्‍यांना कृर्षीपंपासाठी 12 तास अखंडपणे विज पुरवठा करू अशी घोषणा केली होती. मात्र अध्यापही याची अमलबजावणी करण्यात  आली नाही. बुलडाणा जिल्ह्यात अध्यापही कृर्षीपंपांना 12 तास अखंड विजपुरवठा केल्या जात नाही. परिणामी शेती भिजण्यासाठी अडचणी निर्माण होतात व  शेतकर्‍यांना आर्थिक व माणसिक त्रास सहन करावा लागतो. विज वितरण कंपणी जेम तेम सहा तास विज पुरवठा करून शेतकर्‍यांना वेठीत धरत असल्याचा  आरोपही शेतकरी संघटनेने केला आहे. पुढच्या या काळात शेतकर्‍यांच्या कृषीपंपाना 12 तास अखंडीत विजपुरवठा करा, अन्यथा आंदोलन उभारू, असा इशारा  या निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.