Breaking News

शेतमालाची मोजणी इलेक्ट्रीक काट्यावर करा

स्वाभिमानी युवा आघाडीचे आक्रमक धोरण;

बुलडाणा, दि. 27 - शासन आदेश असतांना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकर्‍यांच्या शेतमालाची इलेक्ट्रॉनिक काट्यावर मोजणी न करता पल्ली (फारी)  काट्यावर मोजणी करुन अडते शेतकर्‍यांची लुट करीत आहे. ही त्वरीत थांबवून संबंधीतांवर कार्यवाही करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा  आघाडीच्या वतीने कृउबास सभापती दे.राजा यांच्याकडे करण्यात आली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,कृषी उत्पन्न बाजार समिती आवारामध्ये शेतकर्‍यांच्या शेतमालांची लुट करण्यासाठी राजरोसपणे सुमित ट्रेडर्स, उमेश  ट्रेडर्स, बालाजी ट्रेडर्स, संतोष लक्ष्मण लोखंडे, अरिहंत ट्रेडर्स, बाबुलाल जैन हे अडत व्यापारी शेतकर्‍यांच्या शेतमालाची इलेक्ट्रॉनीक काट्यावर मोजमाप न करता  पल्ली (फारी) काट्यावर मोजमाप करत आहेत. असे दि.26 ऑक्टोबर रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सर्व पदाधिकार्‍यांच्या लक्षात आले आहे. तसेच  आपल्या कार्यालय पत्र जा.क्र. 386/2016-17 दि.24 ऑक्टोबर 2016 या संदर्भिय पत्राची व शासनाच्या आदेशाची पायमल्ली देखील करत आहेत.  शेतकर्‍यांची लुट करणार्‍या व शासनाचे आदेश पायदळी तुडवणार्‍या मुजोर आडते व्यापार्‍यावर तत्काळ कार्यवाही करावी व शेतकर्‍यांची होणारी थांबवावी. अन्यथा  स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात तिव्र आंदोलन करेल व होणार्‍या परिणामाची सर्वस्वी जबाबदारी ही ापली  राहील अशा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.