Breaking News

भयमुक्त वातावरणात मतदान करावे ः टाकसाळे

उमेदवारांनी आयोगाने घातलेल्या मर्यादेत खर्च करावा; पेड न्यूजचा वापर करू नये

बुलडाणा, दि. 27 - जिल्ह्यात नऊ नगर पालिकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणूकीत मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजाविला  पाहिजे. त्याचप्रमाणे मतदारांनी निर्भिडपणे, भयमुक्त वातावरणात मतदान करावे. या निवडणूकीत उमेदवारांनी निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या खर्च मर्यादेपेक्षा  जास्त खर्च करू नये. निवडणूका शांततेने पार पाडण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन  अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी  आज केले.    
आगामी होऊ घातलेल्या नगर पालिकांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने अप्पर जिल्हाधिकारी यांच्या दालनात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले  होते. त्यावेळी पत्रकारांना माहिती देताना ते बोलत होते.  याप्रसंगी उपजिल्हाधिकारी रमेश घेवंदे उपस्थित होते.
उमेदवारांनी आपल्या प्रचारासाठी पेड न्यूजचा वापर न करण्याचे आवाहन करीत अप्पर जिल्हाधिकारी म्हणाले, पेड न्यूजचा प्रचारासाठी कुठल्याही  प्रकारे वापर न करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने केले आहे. याबाबत एक समिती गठीत करण्यात आली असून पेड न्यूजसंदर्भात तक्रार या समितीकडे करता  येणार आहे. त्याचप्रमाणे आयोगाने नगराध्यक्षव नगरसेवक पदासाठी खर्च मर्यादा घालून दिलेली आहे. या खर्च मर्यादेपेक्षा जास्त खर्च होता कामा नये. पेड न्यूज  असल्याची खात्री पटल्यास हा खर्च जाहीरातीमध्ये गणल्या जावून उमेदवारांच्या खर्चात समाविष्ट केला जाईल.
ते पुढे म्हणाले,  प्रत्येकाने पदवीधर मतदार नोंदणी वाढविण्यासाठी प्रयतक् करावे. पदवीधरांनी स्वत: वैयक्तिक स्तरावर मतदार नोंदणी करावी.  दिवाळीच्या सुट्ट्या बघता प्रत्येक पदवीधराने मतदार नोंदणी साठी या सुट्ट्यांचा उपयोग करावा. पदवीधर मतदार संख्या वाढविण्यासाठी  समाजातील प्रत्येक  घटकाने प्रयतक् करावे. उमेदवारांनी ऑनलाईन नामनिर्देशन भरल्यानंतर त्याची प्रिंट दुपारी 3 वाजेपर्यंत संबंधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात  द्यावयाची आहे.