Breaking News

बोरगव्हाण येथे फटाकेमुक्त दिवाळी अभियान

परभणी, दि. 27 - महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती व बार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने बोरगव्हाण येथे प्रदुषणमुक्त दिवाळी अभियान राबवण्याचा संकल्प निश्‍चित  केला असुन आजच्या धकाधकीच्या जीवनात मानवाचे आयुष्यमान प्रदुषणाने खालावत चालले असुन बोरगव्हाण या छोट्याशा गावातील नागरिकांनी निर्सगाच्या  सानिध्यात साध्या पद्धतीने प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संंकल्प केला असल्या कारणाने संपुर्ण जिल्ह्यात या अभियानाचे कौतुक होतांना दिसुन येत  आहे.बोरगव्हाण येथे सर्व शालेय विद्यार्थ्यांनी यंदाची दिवाळी फटाकेमुक्त साजरी करण्याची शपथ घेवुन समाजापुढे एक नवा आदर्श ठेवला आहे.यावेळी प्रमुख  मार्गदशर्क म्हणुन बार्टीचे पाथरी तालुका समतादुत व अनिसचे कार्यकर्ते सचिन डोंगरे यांनी दिवाळीमध्ये फटाके व शोभेच्या दारूची खरेदी करू नये असे आवाहन  केले.फटाक्यामुळे प्रचंड प्रमाणात वायु प्रदुषण होवुन परिसरातील नागरिकांच्या श्‍वसनावर परीनाम होतो हे विद्यार्थ्यांना पटवुन देवून वायु प्रदुषणाचे समाजावर  होणारे दुष्यपरिणाम सांगीतले .शोभेची दारू पैसे देवुन उडवणे हे केवळ पैशाचा अपव्ययच नसुन पैसे मोजुन श्‍वसनाचे आजार विकत घेण्यासारखे असल्याचे सांगुन  शालेय मुलांचे मन परावर्तीत करण्यात मोठे यश मिळवले.समतादुतांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी यावेळी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प घेतला व  फटाक्यावर होणार्‍या अनावश्यक खर्चा एैवजी याच पैशातुन आपल्या महा पुरूषांनी लिहलेल्या पुस्तकांची खरेदी करून महा पुरूषांचे विचार आत्मसाद करण्याची  शपथ घेतली.या अभिनव उपक्रमामुळे बोरगव्हाण सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला असुन समाजापुढे एक नवा आदर्श प्रस्थापित करणार्‍या शालेय मुलांंंंचा  वारसा इतर मुलांनीही जोपासावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक गिल्डा यांनी या स्तुत्य उपक्रमा बद्दल विद्यार्थ्यांचे  आभार व्यक्त केले.240 विद्यार्थ्यांनी व 15 शिक्षकांनी यावेळी प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प केला.