Breaking News

शहीद सुशील कुमार यांच्यावर अंत्यसंस्कार

चंदीगड, दि. 24 - पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात शहीद झालेले सीमा सुरक्षा दलाचे जवान सुशील कुमार यांच्यावर आज त्यांचे मूळ गाव पेहोवा (हरियाणा) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सीमेवर शुक्रवारी झालेल्या गोळीबारात सुशील गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान रविवारी त्यांचा मृत्यू झाला. अंत्यसंस्कारावेळी सुशील यांना मानवंदना देण्यात आली.
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी शहीद सुशील कुमार यांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये देण्याची घोषणा केली. सुशील कुमार यांच्या बलिदानाचा आम्हाला अभिमान असल्याचे त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले. अंत्यसंस्कारावेळी संपूर्ण परिसरातील दुकाने व बाजार बंद ठेवून सुशील कुमार यांना आदरांजली वाहण्यात आली. हरियाणाचे मंत्री कृष्ण बेदी, माजी अर्थमंत्री हरमोहिंद्र सिंग चठ्ठा, स्थानिक आमदार जसविंद्र सिंग संधू आदींनी श्रद्धांजली वाहिली.