Breaking News

अश्‍विन, जडेजाला उर्वरित मालिकेसाठीही विश्रांती

नवी दिल्ली, दि. 25 -  अनुभवी ऑफस्पिनर आर. अश्‍विन आणि डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजाला आणखी विश्रांती देतानाच न्यूझीलंडविरुद्धच्या उर्वरित दोन वनडेसाठी भारताने संघ कायम ठेवला आहे. रांची आणि विशाखापट्टनममध्ये होणार्‍या लढतीसाठी ‘अनफिट’ सुरेश रैनाचाही समावेश नाही.
“पहिल्या तीन लढतींसाठी जाहीर केलेला 14 सदस्यीय संघ उर्वरित दोन वनडेत कायम असेल. मायदेशातील आगामी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसह व्यग्र वेळापत्रकामुळे अश्‍विन आणि जडेजाला विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सुरेश रैना अद्याप तापातून पूर्णपणे बरा झालेला नाही. त्यामुळे त्याला संघातून वगळण्यात आल्याचे राष्ट्रीय निवडसमितीने ठरवल्याचे बीसीसीआयने प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पाच लढतींच्या पेटीएम वनडे चषक मालिकेत भारताने 2-1 अशी आघाडी घेतली. उर्वरित दोन लढती रांची (26 ऑक्टोबर) तसेच विशाखापट्टनममध्ये (29 ऑक्टोबर) होतील.
भारताचा संघ : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, मनीष पांडे, हार्दिक पंडया, उमेश यादव, अक्षर पटेल, जयंत जाधव, अमित मिश्रा, जसप्रीत बुमरा, धवल कुलकर्णी, उमेश यादव, मनदीप सिंग.