Breaking News

भोकरदन येथे 21 वर्षीय युवकाचा विहिरीत पडून मृत्यू

जालना, दि. 24 - भोकरदन (जि. जालना) येथे विहरीत पडून एका 21 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, शेतात जात असताना बैलगाडी विहिरीत पडल्याने ही घटना घडली. झाला. सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना जोमाळा शिवारात घडली. भगवान विलास राऊत असे युवकाचे नाव आहे. मूळचा बाभूळगांव येथील रहिवाशी असून, त्याचे आई,वडील मोलमजुरी करतात. त्याला एक लहान भाऊ आहे. घरची परिस्थिती हलाखिची असल्याने तो लहानपणापासून मामा अण्णा शेंद्रे रा. फत्तेपुर यांच्याकडे रहायला होता. शेतात मजूरी करीत होता. भगवान याचे पार्थिव शवविच्छेदनासाठी भोकरदन ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले असून, विहीरीतील बैलगाडी व मृत झालेले 2 बैल जेसीबी मशीनच्या सहय्याने बाहेर काढण्यात आले.