Breaking News

कदम यांच्या गुंडगिरीमुळे काँग्रेस खिळखिळी ः म्हेत्रे

तासगांव, दि. 24 -  विश्‍वजित कदम यांनी तासगांव तालुक्यात लक्ष घालण्यापेक्षा कदम काँग्रेस सोडून आपला काँग्रेस पक्ष वाढविण्याचा प्रयत्न करावा, कदम  यांच्या गुंडगिरीमुळेच जिल्ह्यातील काँग्रेस खिळखिळी झाली असल्याची टीका नगराध्यक्ष राजू म्हेत्रे, नगरसेवक अविनाश पाटील, अनिल कुत्ते यांनी पत्रकार  बैठकीत केली.युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्‍वजित कदम यांनी नुकतेच तासगाव येथील काँग्रेस पक्षाच्या बैठकीत तासगावातील भाजपाची गुंडगिरी मोडून काढू,  असे वक्तव्य केले होते. त्या पार्श्‍वभूमीवर    भाजपचे नगराध्यक्ष राजू म्हेत्रे, अविनाश पाटील आणि अनिल कुत्ते यांनी पत्रकार बैठकीत विश्‍वजित कदम यांना थेट  प्रत्त्युतर दिले. विश्‍वजित कदम यांनी इंजिनिअरिंग, मेडिकल कॉलेजमधील पैशाच्या जीवावर तासगावातील जनतेला विकत घेण्याचा प्रयत्न करु नये. त्याला येत्या  निवडणुकीमध्ये तासगावातील मतदार चोख उत्तर देतील. शिवाय गुंडगिरी नक्की कोणाची आहे हे सर्वांना माहिती आहे. काँग्रेसमधील कदम काँग्रेसच्या गुंडगिरीला  कंटाळूनच अनेकजण भाजपामध्ये गेले. त्यामुळेच काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला सांगली जिल्हा भाजपामय झाला आहे, अशी टीका राजू म्हेत्रे यांनी केली.खासदार  संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वावर पूर्णपणे विश्‍वास तासगावातील जनतेचा आहे. त्या विश्‍वासावरच पालिकेत आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन काम करत  आहोत.