दोन ठिकाणी आघाडी, 6 ठिकाणी स्वबळावर निवडणुका : पतंगराव कदम
सांगली, दि. 24 - आष्टा आणि इस्लामपूर नगरपालिकांसाठी स्थानिक पातळीवर अन्य पक्षांशी आघाडी करण्यात येणार असून सहा ठिकाणी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवण्यास तयार असल्याची माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पतंगराव कदम यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.
काँग्रेस भवनमध्ये जिल्ह्यातील पदाधिकार्यांच्या बैठकीसाठी आमदार कदम सांगलीत आले होते. ते म्हणाले, जिल्ह्यातील पाच नगरपालिका आणि चार नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. तेथे परिस्थितीनुसार स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सुचवले होते. प्राथमिक चाचपणीनंतर आष्टा आणि इस्लामपूर वगळता अन्यत्र स्वबळावर लढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आष्टा आणि इस्लामपूर नगरपालिकेसाठी कोणाशी आघाडी करायची याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. परिस्थितीनुसार काँग्रेसच्या हिताचा जो निर्णय असेल तो घेऊ.
स्वबळावरही निवडून येईन ः मोहनराव कदम म्हणाले, कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर राखत सांगली-सातारा विधानपरिषदेसाठी अर्ज दाखल करणार आहे. कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही. राष्ट्रवादीने ही जागा काँग्रेसला दिली नाही, तर पक्ष पातळीवर योग्य निर्णय होईल. काँग्रेस स्वबळावर लढली तरी मी निवडून येऊ शकतो. सर्वच पक्षांत माझे मित्र आहेत. राष्ट्रवादीच्या सदस्यांकडूनही मला मदत मिळू शकते.