Breaking News

छाप्यामुळे बोगस डॉक्टरांचे पलायन

चिखलवाडी (ता. शिराळा), दि. 29 -  येथे चार परप्रांतीय बोगस दंत चिकित्सकांनी आरोग्य पथकाच्या छाप्यानंतर साहित्य तिथेच टाकून मोटारसायकलवरुन  पळ काढला. त्यांच्या साहित्यातील ओळखपत्रावरुन जसवेंद्र अत्तरसिंह (32), अरवेंद्र त्रिवेंद्र सिंह (25), गजेंद्र दत्तपाल सिंह (34), जोगनर पोनपाल सिंह (37,  सर्व रा. धामपूर-बिजनूर, पंजाब) अशी त्यांची नावे असल्याचे दिसून आले आहे. याबाबत शिराळा पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू  होे.
या मोटारसायकली जी जे पासिंगच्या होत्या. पुढील क्रमांक पुसट असल्याने दिसून आले नाहीत. हे चौघे पळून जाताना त्यांचे साहित्य असणार्‍या चार बॅगा तेथेच  टाकून पळाले. या बॅगांमध्ये दात बसविण्याचे साहित्य, औषधे, त्यांची निवडणूक ओळखपत्रे, बँकेचे डेबिट क्रेडिट कार्ड, तयार कवळ्या आदी साहित्य आढळून  आले.
याबाबत डॉ. घड्याळे यांनी शिराळा पोलिसात फिर्याद दिली असून, बोगस चार डॉक्टरांचे सर्व साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेबाबत गुन्हा दाखल  करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत चालू होते. चारही संशयितांनी काळा पंजाबी पोशाख परिधान केला होता.
चार संशयित दोन मोटारसायकलींवरुन गावोगावी फिरुन दात बसविण्याचे काम करीत होते. पोलिस ठाण्यात चला, असे या पथकाला सांगताच चौघांनी  मोटारसायकलवरुन पळ काढला. या चौघांच्या चार बॅगांमध्ये त्यांची निवडणूक ओळखपत्रे, कवळ्या, डेबिट-क्रेडिट कार्ड, औषधे आदी साहित्य सापडले. या  चौघांच्या बॅगाही एकाच कंपनीच्या आहेत.