Breaking News

दहावी, बारावी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर

पुणे , 29 - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2017 या शैक्षणिक वर्षासाठी घेण्यात येणार्‍या दहावी आणि बारावी  परीक्षेच्या  तारखा जाहीर झाल्या आहेत.
बारावीची परीक्षा 28 फेब्रुवारी ते 25 मार्च 2017 दरम्यान होणार आहेत. तर दहावीची परीक्षआ 7 मार्च ते 29 मार्च या कालावधीत पार पडेल, अशी माहिती  शिक्षण मंडळाने दिली आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळातर्फे ही परीक्षा घेतली  जाणार आहे.