Breaking News

खंडोबा बाजार ते ग्रँंड कॉर्नर सिमेंट रोडच्या कामास प्रारंभ

परभणी, दि. 27 - शहर महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्र. 9 मध्ये दलितोत्तर विकास योजनेतून ग्रँड कॉर्नर ते खंडोबा बाजार कॉर्नर या परिसरात सिमेंट  रोडच्या  कामाचे उदघाटन सभागृह नेते प्रताप देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी महापौर सौ. संगीता वडकर, उपमहापौर भगवानराव वाघमारे,  स्थायी समिती सभापती बालासाहेब बुलबुले, विजय जामकर, सुनिल देशमुख, हसीबुरहेमान, माजीद जगीरदार, माजी नगरसेवक अरविंद देशमुख, बबन मुळे,  मज्जुसेठ सोदागर, बाबा सौदागर, सालेद चाऊस, रामा पवार, किशोर देशमुख, भगवान बालटकर, अशोक बालटकर, विजू नवले. सतीश कारवे, विकास लांडगे,  अभिजीत देशमुख, यांच्या उपस्थितीमध्ये उदघाटन संपन्न झाले.  नगरसेवक सुनिल देशमुख यांनी प्रभाग क्र 9 मध्ये आतापर्यंत शाही मजिद ते अपना कॉर्नर  हॉटमिक्स रोड, मरीमाता मंदिर ते देशमुख हॉटेल, शिवाजी चौक ते नानलपेठ कॉर्नर, मोठा मारोती ते देशमुख हॉटेल, मोठा मारोती ते शाही मजिद, खंडोबा बाजार  ते नाईकवाडे गल्ली या रस्त्याचे कामे झाले आहेत.  उदघाटन प्रसंगी माजी महापौर ता सभागृह नेते प्रताप देशमुख यांनी माझ्या हस्ते 34 लाखाचे उदघाटन प्रभाग  क्र. 9 मध्ये झाले आहे. यापुर्वीही मी महापौर असताना या प्रभागास निधी दिला आहे. तसेच शहरातील मुख्य रस्त्यांचे कामे केली आहेत. कुठलाही राजकीय  भेदभाव न करता विकास कामे केली आहेत.असे सांगीतले.पावसाळ्याच्या काळात या भागातील रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली होती परंतु या भागातील  नागरिकांनी मनपाला सहकार्य करण्याची भावना सदैव कायम ठेवल्यामुळे त्यांचे आभार व्यक्त करत आगामी काळात शहरातील इतर रस्त्यांचा प्रश्‍न मार्गी लावु असे  आश्‍वासन दिले.