Breaking News

दिनदयाल उपाध्याय अंत्योद्य योजना महिलांना देणार ऊभारी


परभणी, दि. 27 - नागरी उपजिविका अभियान अंतर्गत कौशल्य विकास प्रशिक्षणाद्वारे रोजगाराची उपलब्धता या घटकाअंतर्गत विशेष नोंदणी अभियान मेळावा  परावर्तीत निधी वितरण बँक जोडणे आणि विमा संरक्षण कार्यशाळा उदघाटन महापौर सौ. संगीताताई वडकर, उपमहापौर भगवानरावजी वाघमारे यांच्या शुभहस्ते  कल्याण मंडपम येथे संपन्न झाला. यावेळी आयुक्त राहुल रेखावार, स्थायी समिती सभापती बालासाहेब बुलबुले, उपायुक्त अनिल गीते, विरोधीपक्ष नेत्या सौ.  अंबीका डहाळे, नगरसेवक सचिन देशमुख, रामा गुजर, सय्यद अहेमद, आकाश लहाने, विजय धरणे, विधी व न्याय सभापती मेहराज कुरेशी, शेख खाजा,  भिमराव वायवळ, सुशिल कांबळे मान्यवर उपस्थित होते. शहरातील 20 एनजीओ शासनाची मान्यता असणार्‍या प्रमोद महाजन महा कौशल्य उद्योजकता अभियान  केंद्र व महाराष्टˆ शासन पुरस्कृत राष्टˆीय नागरी उपजिवीका अभियानाचे कौशल्य प्रशिक्षणाद्वारे रोजगारांची उपलब्ध या घटकाअंतर्गत मोफत प्रशिक्षण कोर्सेस, हँड  एम्ब्रायडयरी, जरी वर्क, मोती वर्क, मुली व महिलांसाठी प्रशिक्षण देणार आहेत. यासाठी परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने अर्ज घेऊन नोंदणी करावी.  कौशल्य विकास प्रशिक्षणाद्वारे रोजगाराची उपलब्धता या उपांगअंतर्गत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी प्रशिक्षण घेतल्यानंतर भारतीय रिझर्व बँकेमार्फत लोन  देण्यात येईल. तसेच ब्युटी पार्लर, स्पोकन इंग्लीश, कॉम्प्युटर जॉबवर्क, डि.टी.पी. यासारखे कोर्सेस महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येणार आहेत.  महिलांना  सक्षम करण्यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे. महिलांना उद्योग करता येईल व त्यांचा सन्मान वाढेल. व्यवसाय करण्यासाठी कर्ज मिळू शकते. कोर्सेस साठी  महिलांनी व मुलांनी हा कोर्स करावा व स्वतःच्या पायावर उभे रहावे. या अधिक माहिती साठी महापालिकेत अधिकार्यांशी संपर्क साधावा. महिला सक्षम झाल्या  तर घर सक्षम होईल. आर्थिक गरीबी दूर होईल. नगरसेवक सचिन देशमुख यांनी महिलांनी बचत गट सक्षम करावेत. तसेच महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहून  उद्योग करावा त्यासाठी प्रशिक्षण घ्यावे. विरोधी पक्ष नेत्या सौ. अंबीका डहाळे म्हणाल्या बचतगटामुळे महिला स्वावलंबी झाल्या आहेत. यामुळे एकमेकांत संवाद  साधता येते. व महिलांना सक्षम होण्यासाठी उद्योग धंदा करण्यासाठी कौशल्य विकास योजनेच्या प्रशिक्षणात भाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
महापौर सौ. संगीताताई वडकर यांनी शहरातील महिलांना प्रशिक्षणासाठी महानगरपालिकेच्या वतीने राष्टˆीय नागरी उपजिवीका अभियाना अंतर्गत  रोजगाराची उपलब्धता या घटका अंतर्गत शहरातील बचत गट महिलांनी व मुलींनी प्रशिक्षणात भाग घ्यावा. या प्रशिक्षणासाठी शासनाच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात  येणार आहेत. हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर बँकेमार्फत व्यवसाय करण्यासाठी लोन देण्यात येईल. महिलांनी सक्षम होण्यासाठी प्रशिक्षण घेऊन स्वतःचा उद्योग निर्माण  करावे असे आवाहन  केले. उपायुक्त भगवानरावजी वाघमारे यांनी शासनाच्या वतीने प्रशिक्षणासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. कौशल्य विकास आयोजीत  योजनेअंतर्गत सर्वसामान्य मानसाला रोजगार उपलब्ध होईल यासाठी प्रशिक्षण ठेवण्यात आले आहे. शासनाच्या योजना राबविण्यासाठी प्रशिक्षण घेऊन महिलांना  बचत गटाला अनुदानाचा चेक देण्यात येत आहे. बचतगटाला जास्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. महिलांचे शिक्षण कमी आहे.  आर्थिक सुधारणेसाठी बँकेमार्फत लोन देण्यात येईल. यामध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपायुक्त अनिल गीते  प्रकल्प अधिकारी मस्के, सतीश खेमाडे, शेख, रंजना गायकवाड, पी.के.पारधे, नागसेन कांबळे, गणेश गोबिलवार, व सर्व राष्टˆीय नागरी उपजिवीका अभियान  अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेत आहे.