Breaking News

तुकोबांच्या शिकवणीची समाजाला गरज

पुणे, दि. 27 - तुकाराम महाराजांची शिकवण सुविचाराची, सदाचाराची आणि समतेची होती. या तुकोबांच्या शिकवणीची सध्याच्या समाजाला फार गरज आहे,  असे ह.भ.प. शंकरमहाराज शेवाळे यांनी सांगितले.
भोसरी येथे श्री वसंतराव (नाना) लोंढे प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारी (दि. 22) आळंदी रोडवरील सखूबाई गवळी उद्यानात ’तुका झालासे कळस’ हा ह.भ.प.  शंकरमहाराज शेवाळे यांचा कथा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी ज्येष्ठ नगरसेवक वसंत लोंढे, सुरेश म्हेत्रे, माजी नगरसेवक संतोष लोंढे,  देहूगावच्या सरपंच सुनीता टिळेकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हनुमंत म्हेत्रे आदी उपस्थित होते. या वेळी स्थानिक कलाकारांनी ’छत्रपती शिवाजी  महाराज-तुकाराम महाराज भेट’, ’रामदास स्वामी-तुकाराम महाराज भेट’, ’अनगड शाह झाले तुकारामांचे भक्त’ आणि ’तुकाराम महाराजांचे वैकुंठगमन’ हे प्रसंग  नाट्यरूपात सादर केले.ज्येष्ठ नगरसेवक वसंत लोंढे भाविकांशी संवाद साधताना म्हणाले, उत्तर प्रदेश देवभूमी आहे. तर, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. देवांनी  दैत्यांचा संहार केला. तर, संतांनी समाजातील वाईट प्रवृत्तींवर आपल्या कृतीतून सकारात्मक बदल घडविला. अभंगाद्वारे लोकचळवळ उभारून समाजजागृती केली.