Breaking News

पी.ए. इनामदार स्कूलचे क्रीडा स्पर्धेत नैपुण्य गुणवंत खेळाडूंचा शाळेच्या वतीने सत्कार

अहमदनगर, दि. 01 -  इकरा एज्युकेशन अ‍ॅण्ड वेलफेअर सोसायटी संचलित पी.ए.इनामदार स्कूलच्या खेळाडूंनी विविध क्रीडा स्पर्धेत नैपुण्य मिळवल्याबद्दल त्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. तायक्वांदो, बॉक्सिंग व कराटे स्पर्धेत पदक पटकाविणार्या खेळाडूंचा सत्कार प्राचार्य जे.एफ. खान यांनी केला.पी.ए. इनामदार शाळेत शिक्षणाबरोबर खेळालाही प्राधान्य देऊन खेळाडूंना प्रोत्साहन देण्यात येते. क्रीडा क्षेत्रात अनेक संधी निर्माण झाल्या असताना विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहता येऊ शकते. कोणतेही मैदानी खेळ खेळल्यास शरीर व मन सदृढ होण्यास विद्यार्थ्यांना मदत होत असल्याचे प्राचार्य जे.एफ. खान यांनी सांगितले.जिल्हा क्रीडा कार्यालय व मनपा आयोजित जिल्हास्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत अली खान याने सुवर्ण तर अजहर खान यांने रौप्य पदक मिळवले. जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत कशफ शेख व अरशान शेख यांनी कास्यपदक तर तायक्वांदो असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय खुली तायक्वांदो स्पर्धेत दानिश तांबोली व अरशान शेख यांनी सुवर्ण पदक पटकाविले.