Breaking News

केडगाव देवी रस्त्याचे काम पुर्ण झाल्याने भाविकांची अडचण दूर

। महापौर सुरेखा कदम यांनी केडगाव देवी परिसराची पाहणी केली । प्रभाग अधिकार्‍यांसह सर्वांची उपस्थिती

 अहमदनगर (प्रतिनिधी)। 01 - नवरात्र उत्सवानिमित्त केडगाव देवी रोडची महापौर सौ.सुरेखाताई कदम यांनी पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे, उपायुक्त भालचंद्र बेहेरे, सभागृह नेते अनिल शिंदे, विरोधी पक्षनेते संजय शेंडगे, शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेविका सौ.उषाताई ठाणगे, नगरसेवक दिलीप सातपुते, दीपक खैरे, शहर अभियंता व्ही.जी.सोनटक्के, इलेक्ट्रिक विभागाचे प्रमुख आर.जी.सातपुते, उद्यान अधीक्षक श्री.गोयल, प्रभाग अधिकारी नाना गोसावी, अभियंता श्री.निंबाळकर, रमेश परतानी, राजेंद्र पठारे, अमोल येवले, मंदिराचे पुजारी श्री.गुरव, श्री.कारखिले तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.
यावेळी सौ. कदम म्हणाल्या की, केडगाव देवी मंदिर परिसरात नवरात्र उत्सव काळात मोठया प्रमाणात भाविक येत असतात. तसेच केडगाव देवी परिसरात देखील मोठया प्रमाणात लोकवस्ती वाढलेली आहे. यामुळे देवी मंदिर ते रेल्वे पूल हा रस्ता मोठया प्रमाणात वाहतूक वाढली होती. नवरात्र उत्सव काळामध्ये भाविक या रस्त्याने पायी दर्शनासाठी येत असतात. यादृष्टीने या रस्त्याचे काम करण्याकरिता मागील शिवसेना-भाजप सत्तेच्या काळात या रस्त्याचे काम पूर्ण करण्याच्यादृष्टीने प्रर्यंकरण्यात आले. सदरचे काम पूर्ण झाल्यामुळे यावर्षी भाविकांना कोणतीही अडचण येणार नसल्याचे त्या म्हणाल्या.
यावेळी सभागृह नेते शिंदे म्हणाले की, शिवसेना-भाजपची सत्ता मनपात आल्यानंतर नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या असून, नागरिकांना नागरी सुविधा देण्याचा आमचा निश्‍चित प्रयत्न राहील. सदरचा रस्ता पूर्ण करून घेण्यात आला आहे. त्यामुळे भाविकांना मंदिरापर्यंत येण्यास सुलभ होणार आहे. तसेच नवरात्र उत्सव काळात संपूर्ण परिसरामध्ये साफसफाई, औषध फवारणी, स्ट्रीट लाईट आदी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित अधिकारी यांना यावेळी सूचना दिल्या असल्याचे ते म्हटले.