Breaking News

एचआयव्ही बाधित मुलांना घडविण्यासाठी प्रोत्साहन द्यावे- जिल्हाधिकारी

परभणी, दि. 29 - एचआयव्ही बाधितांचे आयुष्य निरोगी ठेवण्यासाठी एआरटी सेंटरमार्फत करण्यात येणारे उपचार महत्वपूर्ण असून एचआयव्ही बाधित मुलांच्या  शिक्षणात खंड पडू न देता, त्यांचा आत्मविश्‍वास सतत जागृत ठेऊन शिक्षणाच्या संधींव्दारे त्यांना त्यांचे भावी आयुष्य घडविण्यासाठी प्रोत्साहन द्यावे असे आवाहन  जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी केले.  
नेटवर्क ऑफ परभणी डिस्ट्रिक्ट बाय पिपल लिव्हिंग व्हि एचआयव्ही एडस (विहान) या संस्ेतर्फे दिवाळीनिमित्त फराळ, कपडे व भेटवस्तू वाटपाचा कार्यक्रम  आयोजित करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, एआरटी सेंटर प्रमुख डॉ कुलकर्णी, डॉ सुधांशु देशमुख, देवेंद्र लोळगे, श्री चांडक,  संस्ेच्या अध्यक्ष बबिता चारण, प्रेमराज गायकवाड, तसेच अन्य मान्यवर उपस्ति होते. यावेळी एचआयव्ही बाधित महिला व मुले यांना मान्यवरांच्या हस्ते  दिवाळीनिमित्त फराळ, कपडे व भेटवस्तू वाटप करण्यात आले.
जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल म्हणाले, समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपण समाजाचे काही देणे लागतो जी भावना जोपासली पाहिजे, आणि ही कृतज्ञता  आदान-प्रदानातून सक्रियपणे व्यक्त होत राहिली पाहिजे. एचआयव्ही बाधितांना काळजी व आधाराची आवश्यक्ता असते. एचआयव्ही बाधितांचे आयुष्य निरोगी  ठेवण्यासाठी करण्यात येणारे प्रयत्न अतिशय महत्वाचे असून या मुलांच्या शिक्षणात खंड पडू न देता, या मुलांना त्यांचे भवितव्य घडविण्यासाठी प्रोत्साहन द्यावे.  एचआयव्ही बाधितांना दिवाळीनिमित्त फराळ, कपडे व भेटवस्तू वाटपाचा उपक्रम हा मनाला अतिशय समाधान देणारा असून दिवाळी संस्मरणीय करणारा  असल्याचेही जिल्हाधिकारी श्री. महिवाल यांनी सांगितले. सुत्र संचालन नितीन कारखानीस यांनी केले तर मीना अवचार, चंद्रकांत गायकवाड,संगीता कागदे, उषा  बागल, रत्नमाला शिंदे, गणेश सोळंखे, प्रभाकर देवडे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.