Breaking News

नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळच्या दोन संघांना थ्रो बॉल स्पर्धेत विभागीय विजेतेपद

परभणी, दि. 29 - क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्टˆ राज्य आयोजित विभाग स्तरावरील थ्रो बॉल स्पर्धेत नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेचे 14 व  19 वयोगटातील दोन संघांनी औरंगाबाद व बीड यांना पराभूत करत विभागीय अजिंक्यपद पटकावले आहे. हे दोन्ही संघ राज्य स्पर्धेसाठी पात्र ठरले आहे. येथिल  जिल्हा क्रीडा संकूलातील प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम मैदानावर काल दि. 27 रोजी विभागीय स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत 14 वयोगटातील सैनिकी शाळेच्या  संघात देवळे अजय, घुकसे, समाधान, गणेश दराडे, मारोती घुकसे, आमोल घुकसे, रितेश चव्हाण, पवन शेळके, सुरज खुडे, सुनिल नाईक, गणेश सौदागर,  विजय आमले, प्रसाद पतंगे यांचा समावेश होता. या संघाने औरंगाबाद ग्रामीण संघाचा 2-0 असा विजय मिळवला. तर 19 वयोगटातील संघात मुंजाराम देवळे,  अक्षय खुड्डे, जनार्धन बेले, दिपक किरवले, साईना भुरके, अनिकेत काळे, अंकुश मेंडके, लिंबाजी गर्जे, हनुमान रिटे, तुषार वाटोडे, अभिषेक बोबडे, रितेश देवळे,  शिवप्रसाद घुकसे यांचा समावेश होता. या संघांने बीड संघाचा 2-0 ने पराभव केला. वरील दोन्ही संघ चंद्रपूर येे होणार्‍या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहे.  या खेळाडूंना क्रीडा महेश काळदाते यांचे मार्गदर्शन लाभले. या दोनही संघाचे व प्रशिक्षकाचे प्राचार्य सुरेश नाईकवाडे व थ्रोबॉल संघटनेचे सचिव कैलास माने यांनी  अभिनंदन केले आहे.