Breaking News

नगराध्यक्ष पदासाठी सौ.करूणाताई बोंद निवडणुक रिंगणात!

बुलडाणा, दि. 29 - होवु घातलेल्या चिखली नगर परिषद निवडणुकीसाठी कॉगे्रस पक्षाकडून सौ. करूणाताई सुभाषाअप्पा बोंद्रे यांनी आज आपल्या समर्थकांसह  जावून उमेदवारी अर्ज भरला. यावेळी कॉग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार राहुलभाउ बोंद्रे हे ही त्यांच्या समवेत उमेदवारी अर्ज भरतांना उपस्थित होते. 
चिखली नगर परिषदेची होवु घातलेली निवडणुक प्रक्रीया सुरू झाली असुन यावेळी नगराध्यक्ष सर्व नागरीकामधून निवडण्यात येणार असल्याने कॉगे्रस  पक्षातर्फे कुणाला उमेदवारी मिळणार या विषयी प्रचंड उत्सुकता होती. आज दिनांक 28 ऑक्टोंबर 2016 रोजी कॉगे्रस पक्षातर्फे नगराध्यक्ष पदासाठी सौ.  करूणाताई सुभाषअप्पा बोंदे्र यांनी अर्ज दाखल केल्याने या उत्सुकतेवर पडदा पडला.
अर्ज दाखल करण्यासाठी केवळ एक दिवस उरला असतांना सकाळी 11 वाजता          सौ. करूणाताई बोंद्रे यांनी आपल्या शेकडो समर्थकासंह  निवडणुक कार्यालय गाठुूण अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज भरतांना त्यांच्या समवेत जिल्हा कॉगे्रस कमिटीचे अध्यक्ष आमदार राहुलभाउ बोंद्रे, चिखली तालुका  कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष विष्णु पाटील कुळसुंदर, शहर अध्यक्ष अतहरोद्यीन काझी, माजी नगराध्यक्ष प्रकाशसेठ बोंद्रे, पप्पुसेठ हरलालका, यांचे सह बाजार  समितीचे माजी प्रशासक दिनदयाल वाधवाणी, तालुका कॉगे्रस कमिटीचे माजी अध्यक्ष संजय पांढरे, डॉ. गुलाबराव सपकाळ, माणिकराव जाधव, ईश्‍वरराव इंगळे,  नगरसेवक बाळु लहाने, आशिफ भाई, साहेबराव पाटील, किशोर कदम, बंडु खरात, मोहन खत्री, आत्माराम देशमाने, जिया खासाब, माजी नगराध्यक्षा  प्रा.अरूणाताई कदम, महिला कॉगे्रसच्या विद्याताई देशमाने, नगरसेविका सौ. संगिता गाडेकर, सौ. उषाताई डुकरे, श्रीमती संगिता शिंगणे, श्रीमती प्रमिलाताई जाधव  यांचेसह शेकडो कॉगे्रस कार्यकर्ते उपस्थित होते.