Breaking News

नगरसेवक पदासाठी भाजपा इच्छुकांची गर्दी

नगराध्यक्ष पदासाठी तीन उमेदवा ; भाजपा नगरसेवक इच्छूकांच्या मुलाखती

बुलडाणा, दि. 26 - नगर परिषदेच्या 14 प्रभागातील भारतीय जनता पार्टी च्या इच्छुक 90 उमेदवारांनी तसेच  नगराध्यक्ष पदासाठी 3 उमेदवारांची मुलाखती आज 25 ऑक्टोबर रोजी दुपारी भाजपा  संपर्क कार्यालयात पार पडल्या. नगराध्यक्षपद नागरिकांचा मागासप्रवर्ग महिला या पदासाठी सुवर्णा श्रीराम सपकाळ, कुंदाताई विष्णू पाटील, कुंदा शशांक पंधाडे यांनी पक्षाच्या कोअर  कमिटी सदस्यांसमोर मुलाखत दिली. नगरसेवक पदासाठी सर्वच प्रभागात इच्छुकांची गर्दी  उसळली होती. त्यामुळे इच्छुकात स्पर्धा निर्माण झाली आहे.  याप्रसंगी भाजप कोअर कमिटी सदस्य जिल्हा सरचिटणीस मोहन शर्मा, विश्‍वनाथ माळी,  विधानसभा संपर्क प्रमुख योगेंद्र गोडे, शहराध्यक्षा विजयाताई राठी, उदय देशपांडे,  चिटणीस प्रभाकर वारे, गिरीष तातेड, भगवान एकडे, सिद्धार्थ शर्मा उपस्थित होते. शहरातील  प्रत्येक प्रभागात इच्छुकांच्या मुलाखती स्वतंत्र्यरित्या घेण्यात आल्या. इच्छुकांची संख्या वाढल्याने प्रत्येक प्रभागात आता उमेदवारीसाठी स्पर्धा निर्माण झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू झाली असून पक्षासाठी इच्छुक उमेदवार पक्षाचा  अध्यादेश (एबी फॉर्म) कधी मिळतो. ही प्रतिक्षा करीत आहे.  नगराध्यक्षपदासाठी नमाप्र महिला राखीव असल्याने भारतीय जनता पार्टीच्या जुन्या  फळीतील निष्ठावंत कार्यकर्ते नगर परिषदेत दोन वेळा भाजपाचे नगरसेवक राहिलेले अ‍ॅड. व्ही. डी. पाटील यांच्या पत्नी माजी नगरसेविका कुंदाताई विष्णू पाटील यांनी कमिटी  सदस्यासमोर मुलाखत दिली. तसेच भाजपाचे सक्रीय कार्यकर्ते भाजपा विमुक्त जाती भटक्या  जमातीचे जिल्हाध्यक्ष श्रीराम सपकाळ यांच्या पत्नी सामाजिक कार्यकर्त्या व बचत गटाच्या  माध्यमातून महिला संघटन काम करणार्‍या सुवर्णा श्रीराम सपकाळ यांनी मुलाखत दिली.  तसेच चिखली अर्बन बॅकेचे बुलढाणा शाखाधिकारी शशांक पंधाडे यांच्या पत्नी कुंदाताई शशांक पंधाडे ह्या आर्ट ऑफ लिव्हींगच्या शिक्षीका, अंबिका अर्बन पतसंस्थेच्या सल्लागार,  स्व. मधुकरअप्पा वाचनालयाच्या अध्यक्षा, विश्‍वनाथ बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून बचत  गटाच्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी इच्छुकात स्पर्धा निर्माण झाली आहे.