Breaking News

सोयाबीनला हमी भाव देण्यासाठी तहसिलमध्ये शेतकर्‍यांचा ठिय्या

संग्रामपुर (प्रतिनिधी), दि. 26 - मागील काही वर्षापसून शेतकर्‍यांनी सतत अस्मानी व सुलतांनी संकटांना तोंड दिले. यावर्षी वरुन राजा प्रसन्न झाल्यामुळे पिकासाठी उत्तम असा पाऊस झाला आणि शेतकर्‍यांना यावर्षी काही सुखाचे दिवस पहावयास मिळतील अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून ऐकवयास मिळत होती. परंतु शेतकर्‍यांच्या घरात सोयाबीन येत नाही तोच, व्यापार्‍यांनी सोयाबीनचे भाव पाडले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांचा उत्पादन खर्च सुध्दा निघणे अवघड झाले आहे. या संकटातून सोडवणूक करण्यासाठी सोयाबीनला हमी भाव देण्यात यावा, या मुख्य मागणीसाठी आज 24 ऑक्टोबर रोजी शेतकरी कुटूंबियांनी तहसिल समोर ठिय्या मांडला व जोपर्यंत सोयाबीनला हमी भाव देत नाही तोपर्यंत उठणार नाही अशी भुमीका घेतली.
सोयाबीनचे पीक येताच भाव पाडले जात आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष देणेगरजेचे आहे. यंदा अनेक संकटाचा सामना करीत शेतकर्‍यांनी सोयाबीनचे उत्पादन घेतले. परंतु शेतकर्‍याच्या घरात सोयाबीन येेत नाही तोच, व्यापार्‍यांनी सोयाबीनचे भाव पाडून शेतकर्‍यांची आर्थिक लुट करणे सुरू केले आहे. त्यामुळे सोयाबीनला हमी भाव देण्यात यावा, या मागणीसाठी आज समग्र विकास आघाडीचे तालुकाध्यक्ष गजानन ढगे यांनी बसस्थानका पासून डफडे वाजवत सोयाबीनच्या पोते तहसील कार्यालयावर नेले. यावेळी जोपर्यंत सोयाबीनला हमी भाव मिळत नाही, तोपर्यंत कार्यालयातून हटणार नाही. अशी भूमिका त्यांनी घेतली होती. आपली मागणी रस्ता असून तुमचे निवेदन वरिष्ठाकडे पाठवतो, असे तहसीलदार ढगे यांनी आश्‍वासन दिले. त्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.