Breaking News

अंधेर्‍या वस्तीत शिवसेना लावणार दिवा!

दिवाळी निमीत्त पणत्यांचे वाटप करुन देशमुख यांनी केला संकल्प

परभणी/प्रतिनिधी, दि. 26 -  गेल्या कित्येक वर्षापासुन शहरातील सावता नगर वासीयांच्या घरात अंधार पसरलेला आहे. रात्रंदिवस विजेविना घालविणार्‍या या परभणीकरणांच्या यथा व व्यथा जाणुन शिवसेनेच्या प्रविण देशमुख यांनी संकल्पपूर्वक सावता नगर या अंधेर्‍या वस्तीत दिवा लावणार असल्याचे मत व्यक्त केले आहे. त्यांच्या कार्याला परिसरातील नागरीकांचा मोठ्या प्रमाणात पाठींबा असुन  दिवाळी निमीत्त पणत्यांचे वाटप करुन संकल्प पूर्णत्वास नेणार  असल्याची ग्वाही शिवसेना कार्यकर्ते देशमुख यांनी दिली आहे.  दिवाळीचा आनंद व्दिगुणीत करणार्‍या पणत्यांचे वाटप करण्यात आले. याचा लाभ स्नेह शारदा नगर, एकता नगर, रामकृष्ण नगर, सावता नगर, विवेक नगर वासीयांना लाभ घेतला. भगवा चौक येथे आयोजित हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सारंग शेरे, नितीन जाधव, योगेश शेळके, शिवा सोनवणे, रवी शिवलाड, दिपक वाघमारे, अजय टाक, ऋषीकेश मोहिते, मंदार बर्दापुरकर, कौस्तुभ सनपुरकर, शिवा गवळी, कृष्णा कटारे, राजा बनसोडे, तुकाराम गव्हाणे, पवन आगलावे आदींनी परिश्रम घेतले.