Breaking News

मुकेश अंबानी झोपेतही चार कोटी कमावतात ः फोर्ब्स

नवी दिल्ली, दि. 29 - रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी झोपेतही चार कोटी कमावतात, अशी माहिती ‘फोर्ब्स’ने जारी केलेल्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीत समोर आली आहे. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर ‘फोर्ब्स’ने कॉर्पोरेट, क्रिकेट, बॉलीवूडमधील धनाढ्यांची यादी आणि कमाईची आकडेवारी जाहीर केली आहे.
‘फोर्ब्स’ च्या यादीनुसार मुकेश अंबानी सलग नवव्या वर्षी देशातील श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्यांची एकूण मालमत्ता 22.7 अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास 1.52 लाख कोटी रुपये एवढी आहे. ही कमाई 86 देशांच्या विकासदरापेक्षाही अधिक आहे. मुकेश अंबानींचा महिन्याचा पगार 39 कोटी रुपये इतका आहे. मुकेश अंबानी सात तास झोपतात. त्यानुसार त्यांच्या एकूण मालमत्तेचा हिशेब पाहिला तर झोपेतही ते 4 कोटी 37 लाख रुपये कमावतात.