Breaking News

डब्ल्यूटीए स्पर्धा : सानिया - हिंगिसची उपांत्य फेरीत धडक

सिंगापुर, दि. 29 - सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस या जोडीने तैवानच्या की हाओ चिंग चान आणि युंग जान चान या जोडीचा 7-6, 7-5 असा पराभव करत डब्ल्यूटीए स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्यांचा पुढील सामना कॅरोलिना गार्सिया-ख्रिस्तीना म्लादेनोविच आणि बेथानी माटेक सँड्स-ल्युसी साफारोवा जोड्यांमधील विजेत्या जोडीशी होणार आहे.