Breaking News

टीम इंडियाची ’नई सोच’, आईच्या नावाच्या जर्सीसह मैदानात!

विशाखापट्टणम, दि. 29 - भारत आणि न्यूझीलंड संघांमधील पाचव्या आणि अखेरच्या वन डे  सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.  या सामन्याचं वैशिष्ट्य म्हणजे टीम इंडियाचे शिलेदार आज आपापल्या आईच्या नावाची जर्सी घालून मैदानात उतरले आहेत. फक्त क्रिकेटरच नाही तर  समालोचकांही आईच्या नावाची जर्सी परिधान केली आहे. विशाखापट्टणमच्या रणांगणात ही लढत होत आहे.
दरम्यान, या सामन्यातून गोलंदाज जयंत यादव आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत आहे. टीम इंडियाचा माजी धडकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागने त्याला वन  डे कॅप परिधान केली. धोनीच्या रांचीत खेळवण्यात आलेली चौथी वन डे जिंकून केन विल्यमसनच्या न्यूझीलंडने पाच सामन्यांच्या वन डे मालिकेत 2-2 अशी  बरोबरी साधली. त्यामुळे पाचवा सामना जिंकून मालिकेवर कब्जा मिळवण्याची संधी भारताकडे आहे.