Breaking News

फ्रान्स बॅडमिंटन स्पर्धेत पी.व्ही. सिंधूचा पराभूत

नवी दिल्ली, दि. 29 - रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक विजेती पी.व्ही. सिंधू फ्रान्स खुल्या  बॅडमिंटन  स्पर्धेच्या पराभूत  झाली. चीनच्या ही बिगजियाओ हिने सिंधूचा 22-20, 21-17 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
या स्पर्धेच्या पुरूष एकेरीत एच. एस प्रणयला ही पराभवाचा सामना करावा लागला होता. चीनी तापेईचा चू तिएन चेन याने पुरूष एकेरीच्या दुस-या फेरीत प्रणयचा 21-19, 21-16 असा सरळसेट्ने पराभव केला होता.