Breaking News

सर अहमदखान यांनी मुस्लिम समाजातील अनेक अनिष्ठ प्रथा बंद केल्या ः शहा निजाम




अहमदनगर, दि. 27 - 1857 च्या स्वातंत्र संग्रामची संपूर्ण जबाबदारी इंग्रजांनी मुस्लिम समाजावर लादली व त्यांना कठोर शिक्षा दिल्या. इतर समाजही या  स्वतंत्र्य चळवळीत सामील होता, पण त्यांच्यावर काहीही निर्बंध नव्हते. त्यामुळे मुस्लिम समाजाची आर्थिक परिस्थिती फार बिकट झाली होती. त्या काळात  फारसी ही मुस्लिमांची भाषा होती म्हणून त्याला बदलून इंग्रजीला सरकारी भाषेचा दर्जा देण्यात आला. मुस्लिमांना नोकर्या देण्याचे बंद करण्यात आले. त्यांना  फासावर लटकावण्यात येत होते, तर काहीना  तोफांच्या तोंडी देत तसेच काळ्या पाण्याची शिक्षा दिली जात होती. मुस्लिमांची संपत्ती नष्ट करण्यात येत होती.  मुस्लिमांना फक्त नोकर, आचारी किंवा मजूर याच कामावर ठेवले जात होते. मुस्लिम समाजाने इंग्रजांचा फार त्रास सहन केलेला होता, म्हणून त्यांची इंग्रजी भाषा  शिकायला तयार नव्हता. त्याकाळात सर सय्यद यांनी समाजाला इंग्रजी भाषा शिकण्याचे आव्हानात्मक कार्य त्यांनी केल्याचे प्रतिपादन निवृत्त आरटीओ शहा  निजाम नन्हेमियाँ यांनी केले.
मुकुंदनगर येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने  यांच्या 199 वी जयंती निमित्त मुकुंदनगर येथील दरबार चौक येथे  भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले  होते. प्रमुख पाहुणे मखदुम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दुलेखान, नगरसेवक फय्याज शेख, नसिम खान, माजी नगरसेवक शेख खानसाहब, शेख रऊफ, शेख  बिलाल अहेमद, शेख अजिज, गोटू जहागिरदार आदि मान्यवर उपस्थित होते.
शहा निजाम पुढे म्हणाले की, सर सय्यद यांनी भारतीय मुस्लिम समाजातील अनेक अनिष्ठ प्रथांवर हल्ला चढवला.  आपल्या मतांच्या प्रसारासाठी त्यांनी 1870  मध्ये  तहेजिबुल अखलाक या उर्दू नियतकालिकाची सुरुवात केली. 1888 मध्ये त्यांना सर या पदवीने सन्मानित करण्यात आले.अशा या थोर समाजसुधारकाचे  27 मार्च 1898 रोजी वयाच्या 80 व्यावर्षी  निधन झाले.
आबीद खान यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, सर सय्यद खान हे 19 व्या शतकातील एक भारतीय शिक्षणतज्ञ आणि समाजसुधारक होते.  भारतातील मुस्लिम समाजामध्ये इंग्रजी शिक्षणाचा प्रसार करुन त्यांचा समाजिक विकास साधण्यात त्यांचे योगदान महत्वाचे मानले जाते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  इस्माईल हबीदखाँ यांनी केले तर आभार शेख अब्दुल सईल यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शेख गुलाब, हमीद बाबुभाई, हबीद पेंटर, युसूफ सर, नवेद  मिर्झा, शौकत बाबा, शकिल वस्ताद व सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.