Breaking News

विकासकामांमुळे महाजन गल्लीतील प्रश्‍न मार्गी ः किशोर डागवाले

अहमदनगर, दि. 27 - महाजन गल्लीतील सर्व कामे मार्गी लावली आहेत. येथील नागरिकांना चांगल्या सुविधा मिळत आहेत. सुशोभीकरणाच्या उद्देशाने येथे पेव्हींग  ब्लॉक बसविण्याचे काम हाती घेण्यात आले. आ. संग्राम जगताप यांचे प्रभाग 21वर विशेष प्रेम आहे. त्यामुळे त्यांनी मागील वर्षी 20 लाख व या वर्षी 15 लाखांचा  निधी दिला. मनपाची अवस्था दयनीय असून, प्रभागात विकासकामे होऊ शकत नाहीत. परंतु आ. जगताप यांच्या निधीतून प्रभागात कामे सुरू आहेत. खासदार  दिलीप गांधी यांनीही प्रभागासाठी निधी दिला आहे. जगताप कधीही पक्षीय राजकारण  करीत नाहीत, असे प्रतिपादन नगरसेवक किशोर डागवाले यांनी केले.
प्रभाग 21चे नगरसेवक किशोर डागवाले यांच्या प्रयत्नातून व आ. संग्राम जगताप यांच्या निधीतून महाजन गल्ली येथे पेव्हींग ब्लॉक बसविण्याच्या कामाचा शुभारंभ  दत्तात्रेय पाठक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी श्री. डागवाले बोलत होते. याप्रसंगी उपमहापौर श्रीपाद छिंदम, जि. प. सदस्य सचिन जगताप, चंद्रशेखर  शहाणे, महेश कुलकर्णी, सुहास कुलकर्णी, शांतीलाल मुनोत, शशांक शहाणे, राहुल गांधी, गिरीश सोनी, अशोक कुलकर्णी, सचिन देशपांडे, रमेश सुंकी, अनिल  पुंड, दीपक धारू, अशोक जामगांवकर, मारुती बारसे, तपन घारू, सागर घारू, रमेश गोसावी, सोनू गोसावी, गिरीश सोनी, शहाजी डफळ, सुभाष दारवेकर,  हेमराज व्यास, समीर उपाध्ये, मारुती बारसे आदी उपस्थित होते.
डागवाले म्हणाले की, येथे रस्ते, वृक्षारोपण, बसण्यासाठी बाके, अंतर्गत काँक्रिटीकरण, डांबरीकरण आदींसह जमिनीअंतर्गत सर्व कामे पूर्ण केली आहेत, असे ते  म्हणाले.
छिंदम म्हणाले की, सर्वांकडून निधी आणण्याचे काम डागवालेच करू शकतात. आता मनपातूनही 12 लाखांचा निधी त्यांना दिला आहे. डागवाले यांचे नागरिकांशी  असलेले थेट संबंधामुळे प्रभागामध्ये कुठलेही काम करायचे हे कळते. त्यामुळे प्रभागाचा विकास होण्यास मदत होते. विकासकामांत आम्ही पक्षीय राजकारण  करणार नाही. सर्व पक्षाच्या नगरसेवकांना मनपातून विकासासाठी निधी दिला जाईल, असे ते म्हणाले.
सचिन जगताप म्हणाले की, डागवाले व आमच्यातील संबंध राजकारणापलीकडचे आहेत. आम्ही कधीही विकासकामांत राजकारण करीत नाही. जे कामे करतात,  त्यांना आ. जगताप निधी देतात. आपण ग्रामीण भागात जि. प. सदस्य असून, शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडविण्याचे काम केल्यामुळेच शेतकर्‍यांचा शेतीमाल शहरापर्यंत  येतो, असे ते म्हणाले.