Breaking News

सीमेवरील तणावपूर्ण स्थितीत नौदलाचा पश्‍चिम किनारपट्टीवर महत्त्वपूर्ण सराव

नवी दिल्ली, दि. 29 - भारत व पाकिस्तान सीमेवरील तणावाच्या पार्शवभूमीवर नौदलाकडून पुढील आठवड्यात 2 ते 14 नोव्हेंबर दरम्यान अरबी समुद्रात एक सराव केला जाणार आहे. पश्‍चिम किनारपट्टीवर होणा- या सरावात 40 हून अधिक पाणबुड्या, युद्धनौका याशिवाय लढाऊ विमाने, ड्रोनचा सहभाग असणार आहे.
सैन्यदलाच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सरावात पूर्व किनारपट्टीवरील नौकाही सहभागी होणार आहेत. या आधी झालेल्या सरावातील आणखी अद्ययावत व व्यापक स्तरावरील सरावाचा एक भाग आहे. या सरावाचा उद्देश सैन्याच्या आपत्कालीन तयारीचा आढावा घेण्याबरोबरच जलमार्गाद्वारे होणा-या दहशतवाद्यांच्या कारवाया रोखण्यासाठी नियोजन करण्यात येणार आहे.